एनडीए विरोधात चंद्राबाबू नायडूंनी उगारले बंडखोरीचे हत्यार

narendra modi-chandrababu

टीम महाराष्ट्र देशा: गुरूवारी सादर झालेल्या केंद्रिय अर्थसंकल्पानंतर एनडीए चा घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाने बंडखोरीचे संकेत दिले आहेत. कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी कोणतीही खास तरतूद न केल्याने चंद्राबाबू नायडू केंद्र सरकारवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर देलगू देसम पक्षाने पुढील नियोजनासाठी रविवारी पक्षाची बैठक बोलावली आहे.

चंद्राबाबू नायडूंनी काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांशी टेलीकाँन्फरंन्स द्वारे बातचीत करून आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेल्या अर्थिक तरतूदीवर नाराजी व्यक्त केली. तसेच रविवारी पक्षाची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना तेलुगू देसम पक्षाचे नेते टी जी व्यंकटेश म्हणाले की, या अर्थसंकल्पातून आंध्र प्रदेशच्या वाट्याला काहीही विशेष आले नाही. त्यामुळे केंद्र सरकार वर आम्ही नाराज आहोत. येत्या काळात आम्ही केंद्र सरकार विरोधात युद्धाची घोषणा करणार आहे.

तसेच टी जी व्यंकटेश पुढे म्हणाले की, आमच्यासमोर तीन पर्याय आहेत. पहिला आंध्र प्रदेशला हक्काचे पाणी मिळवण्यासाठी एनडीए मधे राहूनच प्रयत्न करणे, दुसरा आमच्या खाजदारांना केंद्र सरकार मधून बाहेर पडण्यास सांगने व तीसरा पर्याय म्हणजे एनडीए बरोबर युती तोडने. येत्या रविवारी आम्ही मुख्यंमंत्री चंद्राबाबू नायडूंबरोबरच्या बैठकीत योग्य तो पर्याय निवडून पुढील वाटचाल ठरवणार आहोत.