fbpx

चंद्र्बाबुंची धावाधाव, राहुल गांधीं पाठोपाठ दिल्लीत शरद पवारांची भेट

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्यातील मतदान उद्या होणार आहे, तर निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. एका बाजूला सत्ताधारी भाजपकडून पुन्हा एकदा बहुमत मिळण्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेससह तिसऱ्या आघाडीतील नेते सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ जुळवण्याची गणिते मांडताना दिसत आहेत.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत चार्चा केली, , राहुल गांधीं पाठोपाठ नायडू यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. चंद्रबाबू नायडू यांना भाजप अथवा कॉंग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार नसल्याची खात्री वाटत आहे, त्यामुळेच ते समर्थन मिळवण्याचे प्रयत्न आहेत.

गांधी, पवार यांच्या भेटीनंतर चंद्रबाबू नायडू सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. चंद्र्बाबुं नायडू यांची धावाधाव म्हणजे निकालापूर्वीच सत्तास्थापनेसाठी विरोधकांची मोर्चेबांधणी सुरु झाल्याचं चित्र आहे.

मोदी – शहा जोडीशिवाय कोणालाही पाठींबा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निकालांनंतर मोदी – शहा जोडीशिवाय सत्ता स्थापन करण्यास कुणी पुढे आल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याचं सांगितले आहे. तसेच ईव्हीएमशी छेडछाड न झाल्यास भाजप पुन्हा सरकारमध्ये येणं कठिण आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.