fbpx

एका दिवसात गांधी, पवार, मायावती, अखिलेश यांची भेट, मोदीं विरोधात चंद्रबाबूंची ‘लॉबिंग’

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, तर चार दिवसांनी २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी भाजपकडून ‘अबकी बर ३०० पार’चा नारा देण्यात आलाय. तर विरोधकांनी देखील बिगर भाजप सरकारसाठी जुळवाजुळव सुरु केली आहे.

आज मतदान आटोपताच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे काही प्रमाणात निकालांचे चित्र स्पष्ट होणार आहे. पण २३ मेला प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांची धाकधूक असणार आहे. निकालानंतर धावाधाव करायला लागू नये, यासाठी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यानी २३ मे रोजीचं सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मात्र निवडणूक निकालांची वाट न पाहता दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरु केले आहे.

नायडू यांनी काल एका दिवसात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती,

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नायडू यांनी भेट घेतली.