भाजपने आमची अक्षरश: फसवणूक केली !

टीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आम्ही भाजपशी युती केली. ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती. तेव्हा आम्ही युती न करता स्वतंत्रपणे लढलो असतो तर टीडीपीला आणखी 15 जागा सहज मिळाल्या असत्या. विशेष राज्याचा दर्जा देतो, असे सांगून भाजपाने आमची अक्षरश: फसवणूक केल्याचे तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी सांगितल आहे. टीडीपीच्या 37 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा न दिला गेल्याने आणि आंध्र प्रदेशच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे कारण देत चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जर आंध्र पद्रेशला विशेष राज्याचा दर्जा दिला तर बिहार, झारखंड, ओदिशा अशी सगळीच राज्ये विशेष राज्याचा दर्जा मागतील असे म्हणत ही मागणी अर्थमंत्री अरूण जेटलींनी फेटाळली होती.