चंद्राबाबूंचा उद्धव ठाकरेंना फोन; भाजपवरील नाराजांच ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

udhav thackeray and chandrababu naidu

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रात सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपवर मित्रपक्षांची नाराजी वाढताना दिसत आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेन पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तर दुसरीकडे दक्षिणेतील मित्र देखील एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच दिसत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएचीमधून बाहेर पडण्यावर महत्त्वाची चर्चा झाल्याचं समजतय.

मागील एनडीए सरकारमध्ये मित्र पक्षांना दिल जाणार महत्व सध्याच्या सरकारमध्ये दिल जात नाही. तसेच अनेक निर्णयात भाजप इतर मित्रांना विश्वासात घेत नसल्याची टीका देखील अनेकवेळा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच एनडीची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहेत.

अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेशकडे फारसं लक्ष दिलं गेलं नसल्याची तक्रार चंद्राबाबूंकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता दोन्ही नाराज नेत्यांची एनडीएची साथ सोडण्यावर चर्चा झाल्याच दिसत आहे.

Loading...