बाधित फ्लॅटधारकांच्या मोबदल्यासाठी 80 कोटींची तरतूद

अभिजित कटके

पुणे ,२४ जानेवारी (हिं.स.) – चांदणीचौकातील नियोजित उड्डाणपुलासाठी बाधित फ्लॅटधारकांना मोबदला देण्यासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद स्थायी समितीने वर्गीकरणातून उपलब्ध करून दिल्याची माहिती आज स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी दिली.

चांदणीचौक येथील नियोजित उड्डाणपुलासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकसन मंत्री नितीन गडकरी यांनी 421 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन 27 ऑगस्ट रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. उदघाटनाला ५ महिने उलटल्यानंतर पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी ८० कोटीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती पुढे मंजुरी साठी ठेवण्यात आला होता. त्याला आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात अली आहे.

उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या 88 फ्लॅटधारक आणि एक बंगला मालकाला मोबदला म्हणून हा निधी देण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. या बाधितांना रेडिरेकनरच्या दुप्पट मोबदला रोख स्वरूपात मिळणार आहेLoading…
Loading...