आशियाई स्पर्धा : चंदेला-कुमार जोडीने दिले पहिले पदक

टीम महाराष्ट्र देशा – आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताने पहिल्याच दिवशी पदकांचे खाते उघडले. १० मीटर नेमबाजीच्या मिश्र दुहेरी प्रकारात अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्य पदक पटकावले आहे.

सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली भारताची जोडी अचानक तिसऱ्या क्रमांकावर घसरली. पदक मिळाल्यानंतर रवी कुमारने या कांस्यपदकाचं श्रेय पूर्णपणे अपुर्वी चंदेलाला दिलं आहे. भारतीय जोडीचा पात्रता फेरीतला स्कोअर ८३५.३ होता तर कोरियाने ८३६.७ गुण मिळवत भारताच्या पुढचे स्थान पटकावले होते.

रवी कुमारचे हे मोठे यश आहे. २८ वर्षीय २०१४च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक तर २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. तर चंदेलाने याआधी २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कांस्यपदकाचा लिलाव

जगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत तुपकर

You might also like
Comments
Loading...