पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

climte

मुंबई : हवामान खात्याने पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक भागात पाऊस होत असल्याने पुढचे 24 तासांत अतिमुसळधार पाऊस होत असल्याचे दिसत आहे.

पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हा पाऊस होणार आहे. त्यामुळे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा पाऊस जोरदार कमबॅक करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आज पुढील २४ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या