कर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट

भारतीय महिला संघावर सध्या शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. कालच हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारने पोलीस दलात नोकरीची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चांमुडेश्वर नाथ यांनी मितालीला बीएमडब्लू कार देणार असल्याची घोषणा केली आहे.

मितालीने संपूर्ण स्पर्धेत ९ सामन्यात तब्बल ४०९ धावा केल्या असून आयसीसीने तिला विश्वचषक संघाचं कालच कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

भारतीय महिला संघ मिताली राजच्या नेतृत्वाखालीच दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला होता. एवढी जबरदस्त कामगिरी केल्यामुळे बीसीसीआयकडून महिला संघाला प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष असणाऱ्या चांमुडेश्वर नाथ यांनी या बक्षिसाची घोषणा केली असून त्यांनीच यापूर्वी २००७मध्ये मितालीला शेर्वेलो कार गिफ्ट केली होती.

गेल्या ऑगस्ट महिन्यात पीव्ही सिंधूने आणि साक्षी मलिक यांनी जेव्हा ऑलिम्पिक पदक जिंकले होते त्यांना चांमुडेश्वर नाथ यांनी बीएमडब्लू कार भेट दिल्या होत्या. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पीव्ही सिंधूने, दीपा कर्मकार, गोपीचंद आणि साक्षी मलिक यांना ह्या कार देण्यात आल्या होत्या.

You might also like
Comments
Loading...