champion trophy 2017- पाकिस्तान ची अंतिम फेरीत धडक ; भारत -पाक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता

कार्डिफ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडला हरवत फायनलमध्ये  दिमाखात प्रवेश केला . पाकिस्तानने इंग्लंडचा ८ विकेट राखून पराभव केला. टॉस जिंकून पाकिस्ताननं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात शानदार गोलंदाजी करत पाकिस्ताननं इंग्लंडच्या 10 ही फलंदाजांना तंबूत पाठवलं . इंग्लडचा स्कोअर सर्वबाद 211 इतका झाला . रुट(४६), जॉनी बेअस्ट्रॉ(४३), बेन स्टोक्स(३४) यांच्याशिवाय इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही.
इंग्लंडचे हे २१२ धावांचे सोपे आव्हान पाकिस्तानने दोन विकेट गमावताना पूर्ण केले. पाकिस्तानचा सलामीवीर अझर अलीने ७६ धावा केल्या. तर फखार झमनने ५७ धावा करताना विजयाचा पाया रचला. त्यावर बाबर आझम(नाबाद ३८) आणि मोहम्मद हाफीझ(नाबाद २२) यांनी विजयाचा कळस चढवला.  केला.
पाक कडून हसन अलीने 3 विकेट तर रुमान रैस,जुनैद खानने 2 -2 विकेट घेतल्या ,शादाब खानने 1विकेट घेतली तर इंग्लंड चे  2 फलंदाज  धावबाद झाले.
आता क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत -पाक क्रिकेट सामन्याचा थरार अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे कारण , भारतानं सेमिफायनलमध्ये बांग्लादेशला हरवलं तर भारत आणि पाकिस्तान असा सामना होऊ शकतो.