खा. छत्रपती संभाजींचे नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आव्हान

कोणीही कायदा हातात घेऊ नये

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचारा बाबत छत्रपती संभाजी यांनी नागरिकांना शांततेचे आव्हान केले आहे. काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा गोष्टींना सुजाण जनतेनी बळी पडू नये. सर्वांनी नियम पाळावे तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये.

पुढे छत्रपती संभाजी म्हणाले, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आणि सर्वजन एकमेकांच्या दुःखात सहभागी असतात. मात्र अशा परिस्थितीत काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा गोष्टींना सुजाण जनतेनी बळी पडू नये. माझे सर्वांना आवाहन आहे की, कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्वांनी संयम राखावा.

You might also like
Comments
Loading...