तारीख,वेळ, ठिकाण सांगा आम्ही खुल्या चर्चेस तयार, सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

तारीख,वेळ, ठिकाण सांगा आम्ही खुल्या चर्चेस तयार आहोत, राष्ट्रवादी पक्षातील कोणालाही बोलवावे. आमचा पंधरा व भाजपचा साडेचार वर्षातील कारभार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुली चर्चा करावी, असे चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, कुपोषण, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या यामध्ये तीन वर्षात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील रस्त्यांची वाट लागली. खड्डयांमुळे अपघात वाढले. महिलांच्या सुरक्षीतते विषयी मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींच्या पळवून आणण्याची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘ब्र’ शब्द काढत नाही, त्यांची त्याला मूकसंमती आहे किंवा त्यांचे हात बांधले असावेत. सामान्य माणसाने असे विधान केले असते, तर ती व्यक्ती जेलमध्ये असती अशी टीका सुळे यांनी केली.