fbpx

चाकण हिंसाचार : पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर यांची प्रकृती चिंताजनक

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने काल उग्र रूप धारण केल्याचं पहायला मिळालं. राजगुरूनगर आणि चाकणमध्ये तर आंदोलनाचा भडका उडाला होता. दरम्यान काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. काल उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी झाले होते.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत.

दरम्यान,मराठा आरक्षण आंदोलनावेळी काल चाकणमध्ये मोठा हिंसाचार झाला, यामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, हा हिंसाचार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यानी नाही, तर बाहेरून आलेल्या जमावाने केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी सोमवारी चाकणमध्ये बंद पुकारण्यात आला होता, या बंद दरम्यान अनेक गाड्या फोडण्यात आल्या आहेत. एसटी बसला आग लावण्यात आली तर दगडफेकीची घटना देखील घडली होती. या सर्व घटना पाहता शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता.

एल्गार परिषदेचे आयोजक कबीर कलामंच आणि रिपब्लिकन पँथरवर पोलिसांच्या धाडी

मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे