मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा तडकाफडकी राजीनामा ; साहित्य विश्वात खळबळ

टीम महराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते,त्यावरून श्रीपाद जोशींवर अनेकांनी टीका केली होती.आता जोशींनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपला राजीनामा पाठविला आहे. त्यामध्ये त्यांनी सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.जोशी यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे कोणाकडे जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.

साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यामुळे साहित्य महामंडळावर टिकेची झोड उठली होती आणि वाद निर्माण झाला.त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना लक्ष केले जात होते.त्यानंतर आता श्रीपाद जोशी यांनी राजीनामा देऊन साहित्य विश्वात खळबळ माजवली आहे.