मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘खुर्ची’ची भांडणे; कार्यकर्ते भिडले

देवेंद्र फडणवीस

बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदुरा येथील कार्यक्रमाआधी कार्यकर्त्यांच्या दोन गटात वाद झाल आहे. यावेळी सभा ठिकाणी असणाऱ्या खुर्च्याची एकमेकावर फेकाफेकी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना रोखल त्यामुळे मोठा वाद टळाला.

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. मात्र सभा सुरु होण्याआधीच दोन गटात भांडणाला सुरुवात झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांनी आक्रमक होत खुर्च्यांची फेकाफेकी केली. वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.