औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा आरोग्य उपकेंद्रासाठी नवी इमारत उभी करावी या मागणीसाठी गावातील जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंचासह, गावकऱ्यांनी जुन्या धोकादायक इमारतीवर चढून उपोषण केले. लाखो रुपये खर्च करुण बांधलेली धोकादायक आरोग्य उपकेंद्राची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करावी अशी मागणी या आंदोलकाची होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गंलाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर गावकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
जिल्हा परिषद प्रशासन तर्फे २००८ मध्ये सोनखेडा येथे १४ लाख रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली होती. खुलताबाद तालुका परिसरातील रुग्णांना व वयोवृद्धांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी या आरोग्य केंद्राची उभारणी केली होती. पण संबंधित ठेकेदाराने इमारतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे केले. असा आरोप गावकऱ्यांनी केला आणि इमारत ताब्यात घेण्यास नकार दिला. मागील १२ वर्षांपासून ही इमारत धूळ खात पडली आहे. या इमारतीचे वरील छत पूर्णत: खिळखिळे झाले असुन स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच इमारतीच्या आतील भागात मोकाट जनावरांचा वावर असतो.
यामुळे सदर इमारात तत्काळ पाडून त्यात ठिकाणी नवीन इमारत उभी करावी, अशा मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. सोनवणे, सरपंच ललिता सोनवणे, उपसरपंच लता वाकळे, सदस्य राजेंद्र कसारे, मनोज सोनवणे, शेख शबाना, योगिता ठिल्लारे, नवनाथ ठिल्लारे यांच्यासह गावातील महिला-पुरुषांनी सोमवारी सकाळी आठ वाजेपासून इमारतीच्या छतावर चडून साखळी उपोषण सुरू केले होते. दरम्यान जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, आरोग्य अधिकारी शेळके व बांधकाम उपअभियंता काजी यांनी ४० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे लेखी पत्र दिले आणि ३१ मार्चच्या आत काम चालू करण्यात येईल असे लेखी पत्र दिले. त्यामुळे मागणी पुर्ण झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सोनवणे व सोनखेडा गावकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादच्या हॉटस्पॉट वसाहती पुन्हा होणार ‘सील
- आत्तापर्यंत शहरात ४ लाखाहून अधिक कोरोना चाचण्या
- देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना ‘या’ राज्यात मिळतेय स्वस्त पेट्रोल-डीझेल
- महंगाई डायन खाये जात है! परभणीत प्रेट्रोलचे शतक, गॅस सिलिंडर @७७५
- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी २१४ अर्ज; सत्तार यांच्या अर्जावर सुचक म्हणून नितिन पाटील