fbpx

युजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं

टीम महाराष्ट्र देशा- भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हणजे किक्रेटमधले युद्धच….आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तब्बल सव्वा वर्षांनंतर भिडले…साहजिकच रणसंग्राम पाहण्यास मिळाला..पण यावेळी एक आगळावेगळा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला….

बुधवारी झालेल्या या सामन्यात युजवेंद्र चहलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्याने पाकिस्तानच्या उस्मान खान शिनवारीप्रती दाखवलेली खिलाडूवृत्ती क्रीडा चाहत्यांचे मनं जिंकून गेली.

पाकिस्तानची खेळी शेवटच्या टप्प्यात आली होती. पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान खान आणि महंमद अामिर मैदानावर होते. तेव्हा उस्मान खानच्या बूटाची लेस सुटल्या. हे साधारण आहे. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलने कोणताही मनात संकोच न ठेवता खाली वाकून उस्मानच्या बूटाच्या सुटलेली लेस बांधली.