fbpx

भुजबळांच्या ‘या’ गौप्यस्फोटामुळे मनसे लोकसभा लढविणार नसल्याचं झालं स्पष्ट ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना, आता लोकसभा निवडणूक मनसे लढविणार नसल्याचं म्हटलं जातं आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी राज ठाकरे यांनी आघाडीत येण्यासाठी एकही जागा मागितलेली नाही असं म्हटलं आहे. राज ठाकरे पूर्णपणे मोदीविरोधी भूमिका घेत आहेत. मोदींनी देशाचे वाटोळे केले असल्याने मी मोदी विरोधात बोलत राहणार, असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. मात्र, त्यांनी आघाडीत येण्यासाठी एकही जागा मागितलेली नाही असं भुजबळ म्हणाले आहेत.भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यामुळे मनसे लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

याच मुलाखतीत भुजबळ यांनी युती आणि शिवसेनेवरदेखील भाष्य केलं. युती झाली नसती तर विरोधी पक्षांची मते शिवसेनेने घेतली असती. तसेही निवडून आल्यानंतर त्यांनी काय केले असते, ते देवाला माहीत. सत्तेत राहून त्यांनी जी विरोधी पक्षाची भूमिका निभावली होती, ती भाजपाविरोधी मते आता शिवसेनेला मिळणार नाहीत. लोकांनाही माहीत झाले आहे. म्हणतात ना, इंद्राय स्वाहा… तक्षकाय स्वाहा… मोदींना विरोध म्हणून शिवसेनाही स्वाहा… अशीच सारी परिस्थिती आहे असं भुजबळांनी म्हटलं आहे.

1 Comment

Click here to post a comment