जामिनासाठी छगन भुजबळ पुन्हा हायकोर्टात !

NCP leader Chhagan Bhujbal.

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात आपल्याला गोवण्यात आल्याचं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ याचं आहे. गेले २१ महिने आपण जेलमध्ये आहोत, पासपोर्ट ईडीकडे जमा आहे, त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्यावतीनं पीएमएल कोर्टाला करण्यात आली होती. मात्र पीएमएलए कोर्टानं भुजबळांचा जामीन अर्ज फोटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्यानं अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं

दरम्यान, आता छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलं आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या वतीनं ते निर्दोष असल्याचा पुनरूच्चार करत सुप्रीम मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम ४५ (१) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता.

याआधीही पीएमएलए कोर्टानं तसेच मुंबई हायकोर्टानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यावर भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्ट काय प्रतिक्रिया देत हे बघणं महत्त्वाचं आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...