शरद पवार नव्हे तर ताबडतोब क्लीनचीट देण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतात : भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा- शरद पवारांनी राफेल प्रकरणात मोदींची पाठराखण केला असा आरोप करत तारिक अन्वर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सारवासारव करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सरसावले आहेत . शरद पवार नव्हे तर ताबडतोब क्लीनचीट देण्याचे काम केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करत असतात असं मत राष्ट्रवादीचे नेेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर आणि तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर औरंगाबादेत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचिट दिलेली नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,राज्यात महिला व मुली असुरक्षित असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. देशात व राज्यात कॉर्पोरेट भ्रष्टाचार वाढला आहे. राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पवार यांनी मोदी यांची कधीही पाठराखण केलेली नाही. राफेल विमान खरेदीबाबत त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे असं मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे.

पवार यांनी मोदींची कधीही पाठराखण केलेली नाही : फौजिया खान