सगळ्या प्रॉपर्टी जप्त केल्या तरी लोकांचं प्रेम कसं जप्त करणार?,भुजबळांचा सरकारला संतप्त सवाल

डांबले जरी तुरूंगात मज, हा माझा अंत नाही : भुजबळ

बीड : माझ्या प्रॉपर्टी जप्त केल्या जात आहे. सगळ्या प्रॉपर्टी जप्त केल्या तरी लोकांचं प्रेम कसं जप्त करणार? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे . ते बीडमधील समता सभेत बोलत होते. ज्या महाराष्ट्र सदनाच्या इमारतीच्या कामात भ्रष्टाचार झाला असा आरोप आपल्यावर केला जातो. त्या इमारतीमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान मोदी, राहुल गांधी बैठका घेतात, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ओबीसी, मराठा, मुस्लिम यांना आपसात लढवण्याचा सरकाराचा डाव आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. भुजबळांनी स्वर्गीय सुरेश भट यांच्या कवितेत बदल करून त्यांनी कविता केली. त्यावेळी त्यांनी आपल्या कवीतेनं कार्यकर्त्यांची मने जिंकली. या सभेला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली.

भुजबळांनी केलेली कविता-

डांबले जरी तुरूंगात मज, हा माझा अंत नाही, उठेन आता नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही.

अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी , अडवू शकेन मला अशी कुठलीही भिंत नाही.

रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर, डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत नाही.

येतील वादळे, पेटेल तुफान, तरी वाट चालतो.

अडथळ्यांना भिऊन अडथळणे ह्या छगन भुजबळला पसंत नाही.

You might also like
Comments
Loading...