दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो : भुजबळ

नंदुरबार / धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यात विरोधकंवर जोरदार हल्ला चढवला दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो, अशा दीपावलीच्या शुभेच्छा देत राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

ज्यांनी मोदींना गोधरा घटनेत मदत केली. त्यांनाच आज दिल्लीत महत्वाची पदे दिली जात असल्याचे सांगत आपल्याला नाहक अडीच वर्षे जेलमध्ये टाकल्याचे सांगितले. युतीच्या सरकारमध्ये विरोधीपक्ष नेते असतांना आपण सरकार विरोधात उठवलेल्या आवाजाने त्यांचे सरकार पडले होते. हिच भीती ओळखून सध्याच्या भाजप सरकारने खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवत आपल्याला जेलमध्ये डांबल्याचा आरोप देखील भुजबळ यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...