छगन भूजबळ तुरुंगाबाहेर येणार ?

भुजबळ कुटुंबीय

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दीड-पावने दोन वर्षाहून अधिक काळ तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लवकरच तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. भुजबळ गेली दीड वर्षे ज्या आर्थिक गैरव्यवहारामुळे तुरूंगाची हवा खावी लागली ते कलम 45 घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Loading...

दरम्यान, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांचे वकिल शलभ सक्सेना यांनी गुरुवारीच कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे भुजबळांच्या या अर्जावर आजच शुक्रवारी पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळांना आज दिलासा मिळू शकतो तर लवकरच ते तुरूंगाबाहेर येतील अशी शक्यता आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील पीएमएलए कलम 45 बाबत सुप्रीम कोर्टात वारंवार आक्षेप घेतला जात होता. सोबत या विषयावर जनहित याचिकाही झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या आर. एफ. नरिमन आणि संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना हे पीएमओलएमधील कलम- 45 हेच घटनाबाह्य ठरवले आहे. या कलमात अतिशय कठोर अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे एखाद्या आरोपीला न्याय मिळणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे घटनेच्या सिद्धांतानाच या धक्का पोहचतो.

तुरूंगात अमर्याद काळ ठेवणे व जामीन नाकारणे हे संबंधित व्यक्तीवर अन्याय करणारेच ठरते. जामीन मंजूर करणे हा नियम आहे तर जेलमध्ये डांबणे हा अपवादात्मक व परिस्थितीनुसार असते, असे सांगत कलम- 45 ला विरोध होत होता. त्यामुळे छगन भुजबळांच्या तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. आज भुजबळांच्या होणा-या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Loading…


Loading…

Loading...