प्रकृती बिघडल्याने भुजबळ रुग्णालयात दाखल

मुंबई : छगन भुजबळांना जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान आज त्यापूर्वी मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह ३५ आरोपींना दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी ६ सप्टेंबरपर्यंत भुजबळ यांच्यासह इतर आरोपींना वैयक्तिक हमीवर अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला कोर्ट आपला निकाल देणार आहे.

छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला; जेलमधून सुटल्यानंतर पहिलीच भेट

मनी लाँड्रिंग प्रकरण; भुजबळांना ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

You might also like
Comments
Loading...