सीईटीची परीक्षा 29 मार्चला नव्हे, 30 एप्रिलला होणार : उदय सामंत

uday samant

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाव् आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारने सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू यासाठी सरकार सर्वोतोपरी उपोययोजना करत आहेत. प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘ सीईटीची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. येत्या 29 मार्चला सीईटीची परीक्षा होणार होती. आता कोराना व्हायरसच्या संकटामुळे ही परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे. अशीच परिस्थिती उद्भवल्यास परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे,सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सीबीएसई बोर्डाने सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर 31 मार्च नंतर घेण्याचे जाहीर केले आहे.