औरंगाबाद जिल्ह्यातील ४३६ महाविद्यालयातील ७२ हजार ८६१ जागांसाठी होणार ‘सीईटी’ची परिक्षा!

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. मूल्यांकनानुसार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत. आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ४३६ उच्च माध्यमिक, शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार ८६१ उपलब्ध जागांसाठी सीईटी होणार आहे. या सीईटीत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन करून गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे. याचा मोठा लाभ विद्यार्थ्यांना झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६५ हजार १५४ विद्यार्थी चांगले गुण घेऊन उतीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आता अकरावीत प्रवेश घ्यायचा असेल तर राज्य सरकारच्या नियमांनुसार सीईटी द्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील ४३६ महाविद्यालयातील ७२ हजार ८६१ जागांसाठी सीईटी होणार आहे.

सीईटी देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे. राज्य सरकारने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सीईटी अनिवार्य केली आहे. राज्यात अकरावी प्रवेशासाठी सामुहिक सीईटी होणार आहे. ही सीईटी पार पडेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक, शाळा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देऊ नये, अशा कडक सुचना औरंगाबाद विभागाचे उपसंचालक अनिल साबळे यांनी एक परिपञक जारी करून दिल्या आहेत. सीईटी देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य द्यावे, अशा सुचना देखील देखील साबळे यांनी दिल्याचे समजते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP