औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कोट्यावधींच्या जागा, मालमत्ता भूमाफियांच्या घशात गेल्या आहेत, तर उर्वरित अनेक जागा गिळंकृत करण्यासाठी भूमियांचे प्रयत्न सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी व गेलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जि.प.ने कंबर कसली आहे. त्या दृष्टीने मालमत्ता कक्ष स्थापन करून प्रत्येक जागा, मालमत्तेची स्वतंत्र संचिका तयार करून त्या संरक्षित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी समितीला दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शहरात, तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा, मालमत्ता आहेत. अनेक ठिकाणी भूमाफियांनी अतिक्रमण केल्यामुळे आणि संबंधित मालमत्तांची कागदपत्रेच सापडत नसल्यामुळे अडचण झालेली आहे. संचिका गायब झाल्यामुळे कोट्यावधींच्या जागा हातातून गेल्या आहेत. या जागा परत मिळवण्यासाठी आणि ज्या आहेत त्या वाचविण्यासाठी प्रत्येक मालमत्तेची संचिका बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप करायचे, नकाशा तयार करून संबंधित जागांना संरक्षण भिंत बांधून त्या बिओटीवर विकसीत करण्यासाठी देण्यात येणार असल्याचे गटणे यांनी सांगितले.
मागील अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेच्या बैठकीत जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे बोलले जात होते. मात्र जिल्हा परिषदेच्या मालमत्ता वाचविण्यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी कंबर कसली आहे. याबाबत अधिकचा अभ्यास असलेले महसूल व नगररचना विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांचा जागेच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींपासून जिल्हा परिषद प्रशासनाला चांगली मदत होईल, असा विश्वास गटणे यांना आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<