महंगाई डायन खाये जात है! परभणीत प्रेट्रोलचे शतक, गॅस सिलिंडर @७७५

परभणी : जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. डिझेलचे दरही शंभराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. महागड्या इंधन दरांमुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सासतत्याने इंधन दरांमध्ये वाढ होत आहे. यामुळे परभणीकर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आधित अर्थिक परिस्थिती खालवलेली आहे. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य वाहतूकदारांसह व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोमवारी जिल्ह्यात साधे पेट्रोल ९९.१२ रुपये दराने मिळाले तर पॉवर पेट्रोलचे दर १०१.९८ एवढे होते. डिझेलचे दर देखील वाढले असून जिल्ह्यात डिझेल ९१.१२ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. विशेष म्हणजे राज्यात परभणी जिल्ह्यातच पेट्रोलचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

स्वयंपाकाचा गॅस देखील महागला
परभणीत नोव्हेंबर २०२० मध्ये ६२० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ७७५ रुपयाना मिळत आहे. गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी देखील काही महिन्यांपासून मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ‘मंहगाई डायन खाये जात है’ या गाण्याच्या ओळी आपसूकच नागरिकांच्या ओठांवर येत आहेत.

महत्वाच्या बातम्या