केंद्राच्या पॅकेजला ‘आत्मनिर्भर’ हे केवळ गोंडस नाव, यातून दिलासा मिळणे अशक्य : चव्हाण

chavan

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅॅकेजचा समाचार घेतला आहे. हे पॅॅकेज वास्तवात केवळ २ लाख कोटी रुपये खर्च होणार आहे, तर १८ लाख कोटी रुपये कर्ज काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हे प्रोत्साहन पॅकेज नसून, फसवणूक आहे, मात्र त्याला आत्मनिर्भर हे गोंडस नाव देण्यात आले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० लाख कोटी रुपयांच्या कोविड पॅकेजचा तपशील जाहीर झाल्यानंतर, त्यातील फोलपणा समोर आला आहे. २० लाख कोटी रुपयांमधील फक्त २ लाख कोटी रुपये खर्च होणार आहे, तर १८ लाख कोटी रुपये कर्ज काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे यामधून कोणताच दिलासा देण्यात आला नाही. याउलट उद्योगांवर अजून कर्जाचा बोजा देण्याचे काम सुरु आहे.

करोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लोकांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती संपली आहे व बाजारपेठेतील मागणी नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरवठादारांच्या किंवा उद्योगांच्या मालाची विक्री होणे अवघड होणार आहे.

पॅकेजमध्ये रोख मदतीची तरतूद नाही. त्यात फक्त कर्ज काढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोणत्याही घटकाला थेट व त्वरित दिलासा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र सरकारने फसवणूक करून या पॅकेजला आत्मनिर्भर हे गोंडस नाव दिले आहे, असे चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

‘रिकाम्या खोक्यात भाजपची रिकामी डोकी भरून गुजरातच्या अंधार कोठड्या पाहायला पाठवायला हवे’

…तर आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल : WHOने दिला इशारा

केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दरमहा 1 हजार रुपये टाकावे : अर्थतज्ञ बॅनर्जी

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील; राऊतांनी भाजपला दिला इशारा