केंद्र सरकार बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा: शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आता पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना आणण्यासाठी सध्या केंद्र सरकारची विविध राज्य सरकारांसोबत चर्चा सुरु आहे.

या योजनेमध्ये जे दर जाहीर करण्यात आले आहेत, त्या दराने सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी करण्याची राज्य सरकारला परवानगी असेल. फक्त यामध्ये भात आणि गहू पिकाचा समावेश नसेल, कारण हे दोन्ही शेतमाल केंद्र सरकारकडून अगोदरपासूनच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खरेदी केले जातात.

You might also like
Comments
Loading...