भुजबळ ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते; त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकल- आठवले 

chagan bhujbal and ramdas athawale

पुणे: छगन भुजबळ हे उत्तम राजकारणी आहेत, त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकण्यात आलं, पण त्यांचे तुरुंगात असताना देखील राजकारण सुरूच होत. खोटे-नाटे आरोप करून अंजली दमानिया यांनी त्यांना गोवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला.  पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांच्या कार्यकाळात बांधलेले महाराष्ट्र सदन हाउस हे अतिशय चांगले झाल्याच म्हणत आठवले यांनी भुजबळांची स्तुती केली आहे.

रामदास आठवले यांनी आज कोरगाव भिमातील पूजा सकट हिच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पूजा सकट आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे, तसेच तिच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली .

मी भाजपसोबत असल्याने  माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याच म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच नाव न घेता टीका केली. काँग्रेस आणि सर्वांनी मिळून दलित अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही ते म्हणाले.