मैदानावर हेलिपॅड चुकीचं : प्रकाश जावडेकर

prakashjavadekar

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे रविवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यासाठी त्यांचं हेलिकॉप्टर कल्याण पश्चिमेकडील सुभाष मैदानात उतरणार होतं. त्यासाठी मैदानावर हेलिपॅड बनवण्यात येत आहे. मात्र या हेलिपॅडमुळे स्थानिक खेळाडूंना त्रास झाला. त्यामुळे विक्रमीवर क्रिकेटपटू प्रणव धनावडेने त्याला विरोध केला होता. मात्र विरोध करणाऱ्या प्रणव धनावडेला पोलिसांनी धक्काबुक्की करुन, त्याला आणि त्याच्या वडिलांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. दरम्यान केंद्रीय मंत्री जावडेकरांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनीही प्रणव धनावडेची पाठराखण करत, मैदानावर हेलिपॅड बनवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. तसंच आपण हेलिकॉप्टरने नव्हे तर कारनेच कार्यक्रमस्थळी जाणार असल्याचं स्पष्ट केलं.