सुनील तटकरे पुढील लोकसभा लढविण्याचे धाडस दाखवणार नाहीत – अनंत गीते

टीम महाराष्ट्र देशा: पुन्हा लोकसभेमध्ये अनंत गीते विरूध्द सुनील तटकरे अशी लढत होईल का असा प्रश्न जेव्हा केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे खासदार अनंत गीतेंना विचारला गेला तेव्हा त्यांना सुनील तटकरेंना खास सेनेच्या स्टाईल मध्ये फटकारले. ते म्हणाले, “त्यांनी निवडणूक लढवायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मागच्या निवडणुकीचा अनूभव विचारात घता, सुनील तटकरे हे पुढील लोकसभा लढविण्याचे धाडस दाखवितील असे आपल्याला वाटत नाही.”

दरम्यान, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते आणि सुनील तटकरे यांची सरळ लढत झाली होती यात शिवसेनेच्या अनंत गीतेंनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना पराभूत केल होत.