नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस बजावली असून दिल्लीमधील ईडीच्या मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावरच आता ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“केंद्रीय तपास यंत्रणा या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम करत आहेत. केंद्र सरकारच्या इच्छेनुसार या तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांचा निर्लज्जपणे वापर सुरू असून केंद्र सरकार या यंत्रणांना जे काही सांगते ते या यंत्रणा करत आहेत. त्यांच्याकडून फक्त विरोधी पक्षांवरच कारवाई होत आहे. विरोधकांना दाबण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर होऊ शकत नाही.”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
दरम्यान अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात ईडीने नोटीस पाठवली आहे. यावरून सध्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथील नेत्यांवरच कारवाई करत असल्याचा आरोप अनेकदा केला आहे. आता ते यावरही काही प्रतिक्रिया देतील का, अशा चर्चा आता रंगत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: २००८ नंतर पहिल्यांदाच ‘हे’ तीन खेळाडू नसणार आयपीएलचा भाग
- “आता देश बदलत आहेत…” The Kashmir Files वर विवेक अग्नीहोत्रीची प्रतिक्रिया
- महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक अनुदानात होणार वाढ!
- “काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून दाखवू नका”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- IPL 2022: फिटनेस टेस्टचा रिझल्ट आला; हार्दिक पास तर शॉमुळे दिल्लीला लागणार धक्का?!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<