fbpx

जवानांचे प्राण गेल्यावर सरकारला आली जाग; जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात

टीम महाराष्ट्र देशा: रमजानच्या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती, काश्मीर खोऱ्यातशांतात रहावी यासाठी ही शस्त्रसंधी लागू करण्यात आली. मात्र, एकतर्फी शस्त्रसंधी लागून केल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना मोठ्या प्रमाणात पेव फुटले, ज्यामध्ये भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. आता शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

मुस्लीम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित रहावी यासाठी केंद्र सरकारकडून शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती, शस्त्रसंधी लागू केल्याने सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली, गृहमंत्रालयाकडून ट्विटकरत जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता लष्कराला दहशवाद्यांविरोधात शोधमोहिमा राबवून कारवाई करता येणार आहे.