केंद्र सरकार करणार तब्बल 20 लाख पदांसाठी मेगा भरती

सध्या मोदी सरकारवर वेगवेगळ्या कारणांनी टीका केली जात आहे. त्यातच नोटबंदीनंतर अनेकांना आपली नौकरी गमवावी लागली  आहे. त्यामुळे देशात रोजगाराची संधी नसल्याची टीका होत असलेल्या मोदी सरकाने हि संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच केंद्र आणि राज्यात तब्बल २० लाख रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार सध्या श्रम मंत्रालयाकडून सरकारी खात्यांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची माहिती घेतली जात आहे. हि माहिती गोळा झाल्यानंतर एक प्लॅन केंद्र सरकारसमोर ठेवला जाईल आणि त्यानंतर नोकरी भरती सुरु करण्यात येईल.  या मेगा भरतीमध्ये केंद्रीय मंत्रालय आणि सरकारी विभागांसह पब्लिक सेक्टरमधील २४४ कंपन्यांसाठी या जागा भरण्यात येणार आहेत.  यामध्ये रेल्वेमध्ये सुरक्षेसंबंधी २ लाख नोकर भरती केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
You might also like
Comments
Loading...