गडकरींकडे रेल्वे मंत्रालय; तर शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद मिळणार ?

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला आता गती मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच बोलल जात होत. मात्र, काल अचानक राजीव प्रताप रुडी आणि उमा भारती यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उद्या म्हणजेच २ सप्टेंबर रोजी नवीन मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे.

उमा भारती यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे महेंद्रनाथ पांड्ये यांची उत्तर प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून काही मंत्र्याना नारळ दिला जाणार आहे. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना रेल्वे मंत्रालयाचा पदभार तर मित्रपक्ष शिवसेनेला आणखीन एक मंत्रीपद मिळू शकते. तर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी संधान केल्याने जेडीयूला हि मंत्रीपद देण्यात येण्याची चिन्हे आहेत.