केंद्र सरकार राज्याला मदत देत नाही- बाळासाहेब थोरात

bb thorat

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिल, पण केंद्र सरकार मदत देत नाही. असे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. परतीच्या पावसात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे, मदत करणे ही काळजी राज्य सरकार घेईल. असे ना.थोरात यांनी म्हटले आहे.

ना.थोरात पुढे म्हणाले की, यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकेही वाया गेली आहेत.

या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत करावी. केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राने तुटपुंजी मदतच केली आहे, असे ना.थोरात म्हणाले.

अशा संकट काळात मदत करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असते, आम्ही प्रस्ताव पाठवतो पण केंद्र सरकार जेवढी गरज असते तेवढी मदत देत नाही. आम्ही चक्रीवादळाचा प्रस्ताव पाठवला पण केंद्राने कमी मदत केली. राज्यात कोरोनाची परिस्थिती आहे, राज्य अडचणीत आहे तरीही आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी भक्कम उभे राहू. केंद्राने भरीव मदत द्यावी यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी फोनवर चर्चा करतील. असे देखील ना.थोरात यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-