‘त्या’ मध्यरात्रीला एक वर्ष पूर्ण; केंद्र सरकार देशभरात साजरा करणार ‘जीएसटी’ दिन

टीम महाराष्ट्र देशा: देशातील करप्रणालीमध्ये अमुलाग्रबदल करत ३० जून २०१७ च्या मध्यरात्री जीएसटी लागू करण्यात आला होता. वस्तू आणि सेवाकर म्हणजेच ‘जीएसटी’ करप्रणालीला आज एकवर्ष पूर्ण होत आहेत. याच औचित्य साधून भाजपाकडून देशभरात जीएसटी दिन साजरा केला जाणार आहे.

bagdure

एक देश एक करचा नारा देत गेल्या वर्षी देशभरात जीएसटी लागू करण्यात आला, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणारी भिन्न करप्रणाली यामुळे मोडीत निघाली. जीएसटी लागू करण्यापूर्वी जवळपास १७ वेगवेगळे कर भरावे लागत. मात्र, जीएसटीने देशातील व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. देशातील करदात्यांची संख्या 1.20 कोटी झाली आहे. तर महाराष्ट्राचा आकडा 9.10 लाख आहे.

दरम्यान, सरकारककडून जरी जीएसटीचे गोडवे गायले जात असले तरी विरोधीपक्षांकडून मात्र टीका केली जात आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकवेळा जीएसटीवर कडाडून टीका केली आहे.

You might also like
Comments
Loading...