केंद्रीय कर्मचारी संघटनांचा आज देशव्यापी संप

मुंबई : केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे. याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही संपात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना या संपाचा मोठा फटका बसणार आहे.

सरकारकडून कामगारविरोधी धोरणं राबवली जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय. या संपामध्ये देशभरातील 20 कोटी कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा विविध संघटनांनी एकत्र येत केलाय. 10 कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती.