निवडणूकांच बिगुल लवकरच वाजणार, उद्या निवडणूक आयुक्त पाहणीसाठी मुंबईत येणार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या तारखा बुधवारी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी राज्याच्या तयारीचा आढावा घेऊन पत्रकार परिषद घेवून तारखा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट दिल्लीत सादर केले जातील. त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली जाईल. महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग  महाराष्ट्र , हरियाणा, आणि झारखंड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. या तिन्ही राज्यात या वर्षा अखेरीस निवडणुका पार पडणार आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकी संदर्भात दिल्ली येथे बैठक बोलावली होती. तसेच महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते.