केंद्राचं पथक दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा – दुष्काळसदृश्य स्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस राज्याच्या विविध भागात दौरा करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. या पथकात एकंदर 10 सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांचे तीन गट करण्यात येणार असून ते मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांना भेटी देऊन तिथल्या पीक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

या पथकातील सदस्य तिथल्या शेतकर्यांहशी प्रत्यक्ष चर्चा करून पिकांच्या नुकसानाची माहिती घेणार आहेत राज्यातील शेतकर्यांलना आर्थिक मदत जाहीर करण्यापूर्वीची सर्वसाधारण भेट आहे. राज्य सरकारकडून या पथकातील सदस्यांना पर्जन्यमानाची आकडेवारी, प्रत्येक भागात घेतल्या जाणार्याट पिकांची माहिती तसंच यापूर्वी स्थानिक महसूल अधिकार्यांआनी तयार केलेले पीक परिस्थिती पाहणीचे अहवाल यांची माहिती देण्यात येईल असंही या सूत्रांनी नमूद केलं. राज्य शासनानं सुमारे 151 तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार; गिरीश महाजन घेणार शेतकऱ्यांची भेट