महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी

raju shetti

सांगली : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून राज्यातील विविध नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. तर, घरातून बाहेर पासून जनतेच दुःख समजून घ्यावं अशा टीकेचे धीनी होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कृतीतून उत्तर देण्याचं ठरवलं आहे असं दिसून येतंय. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार आहेत, मात्र आता वेळ निघून गेल्याची टीका भाजपने केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी व मदतीसाठी केंद्राने तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्राद्वारे केल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी राज्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाहणी करत भरीव मदतीची घोषणा केली होती. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. तसेच शेती नुकसानीबाबत दौरे करून काही होणार नाही, असा टोला लगावत तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचं देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-