बालचित्रपट म्हणवणाऱ्या ‘जग्गा जासुस’ला सेन्सॉर बोर्डाचे U/A  सर्टिफिकेट

वेबटीम: आपल्या वेगवेगळ्या निर्णयामुळे नजीकच्या काळात वादात सापडणाऱ्या सेन्सार बोर्डाने पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. अनुराग बासू दिग्दर्शित आणि रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत असलेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाला  बोर्डाने U/A  सर्टिफिकेट दिले आहे.  यामध्ये विशेष बाब म्हणजे  हा चित्रपट बालचित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. अस असताना चित्रपटाला U/A  प्रमाणपत्र मिळणे हे धक्कादायक मानले जात आहे.  या सर्टिफिकेटनुसार आता हा चित्रपट मुलं केवळ मोठ्यांसोबतच पाहू शकतील.

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या कोणत्याही सीनमध्ये  कट सुचवलेला नाही. गुरुवारी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे गेला होता आणि शुक्रवारी म्हणजे अगदी दुसºयाच दिवशी हा चित्रपट मुलांनी एकट्यांनी पाहण्यासारखा नाही, असे सांगत बोर्डाने यास U/A  सर्टिफिकेट देऊन पास केलेआहे . बोर्डाच्या या निर्णयावर ‘जग्गा जासूस’च्या अख्ख्या टीमने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात U/A  सर्टिफिकेट देण्यासारखे असे यात काय आहे, असा प्रश्न टीमकडून उपस्थित केला जात आहे.

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या मते, बोर्ड या मुद्यावर काहीही बोलणार नाही. लोक हा चित्रपट बघतील, तेव्हा त्यांचा आपोआप सेन्सॉर बोर्डाचा निर्णय कसा योग्य हे कळेल. या चित्रपटात रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या सायन्स फिक्शन चित्रपटात एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे. हा मुलगा आपल्या वडिलांच्या शोधात बाहेर पडतो. यात रणबीर कपूर दहावीतील मुलाची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेसाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली. दहावीतला मुलगा दिसावा म्हणून त्याने यासाठी बरेच वजनही कमी केले. शिवाय यात त्याची हेअरस्टाईलही बदलण्यात आली.