पद्मावतीला सेन्सॉर बोर्डचा दिलासा; मात्र नाव बदलाव लागण्याची शक्यता?

पद्मावती

टीम महाराष्ट्र देशा: सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरलेल्या पद्मावती सिनेमाच्या अडचणी अखेर संपल्याच दिसत आहे. काही अटींसह सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा सिंगल दाखवला आहे. २८ डिसेंबरला एका कमिटीकडून सिनेमाचा रिव्हू घेण्यात आला होता. त्यानंतर आता काही बदल सुचवत यूए सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र चित्रपटाचे नाव बदलेले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पद्मावातीमध्ये राजपूत समाज आणि राणी पद्मावतीचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आक्षेप आहे. राजस्थानात करणीसेनेने या विरूद्ध आंदोलनही केली होती. त्यानंतर राजस्थान ,गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर आधीच बंदी घातलेली आहे. मात्र आता सेन्सॉर बोर्डाकडून दिलासा मिळाल्याने चित्रपट कधी सिनेमा गृहांमध्ये येणार हे पहाव लागणारे.