celkin cliq- सेलकॉन क्लिक् स्मार्टफोनची एंट्री

एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरासह यात फेस डिटेक्शन, पॅनोरामा, स्माईल शॉट, ऑटो सीन डिटेक्शन हे फिचर्स असणार आहेत. क्लिक् या स्मार्टफोनमध्ये २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. ड्युअल सीमकार्डची सुविधा असणार्‍या या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय यात वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी, अ‍ॅक्सलेरोमीटर, प्रॉक्झिमिटी सेन्सर, अँबियंट लाईट सेन्सर हे फिचर्स राहणार आहेत.

६४ बीट क्वॉड-कोअर कोर्टेक्स ए ५३ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.

हा स्मार्टफोन ८,३९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा सेलकॉनने केली आहे.