सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

amitabh

जोधपुर: आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. जोधपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने मुंबईहून जोधपूरला रवाना झाली आहे.

जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. मुंबईतून निघालेले डॉक्टर जोधपूरला पोहोचल्यानंतर, अमिताभ बच्चन यांची तपासणी करतील आणि त्यानंतर पुढील उपचारासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.