‘कोरोना नियमांचं पालन करुन कोजागिरी आनंदात साजरी करा’, अजित पवारांचे आवाहन

‘कोरोना नियमांचं पालन करुन कोजागिरी आनंदात साजरी करा’, अजित पवारांचे आवाहन

ajit pawar

मुंबई: आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कोजागिरीच्या शुभेच्छा देत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन स्वत:ची,कुटुंबाची,समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन कोजागिरी आनंदात साजरी करा. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याच्या प्रथा-पद्धती हे आपलं सांस्कृतिक वैभव असून ते टिकवण्याचा,वाढवण्याचा प्रयत्न करूया. असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान आज ईद-ए-मिलाद उत्सवाच्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘मानवतेची शिकवण देणाऱ्या मोहम्मद पैंगबर यांचे स्मरण करून माणुसकीचे नाते जपण्याचा संकल्प करूया आणि बंधुत्वाचे नाते दृढ करत ईद साजरी करूया. असे ट्वीट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या