प्रभागातील विकासकामांवर नजर ठेवण्यासाठी नगरसेवकाने बसवले सीसीटीव्ही

cctv set by vasant more

पुणे: शहरात केली जाणारी विकासकामे अनेकवेळा  निकृष्ट दर्जाची झाल्याची ओरड  नागरीकांकडून केली जाते.  अशा प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारांना लोकप्रतिनिधींच अभय असल्याचही दिसून आल आहे.  मात्र आपल्या प्रभागात सुरू असलेल्या विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधींनेच सीसीटीव्ही बसवले असल्याच आपण कधी पाहिलय.

याच सर्व गोष्टीना फाटा देण्यासाठी पुणे महापालिका क्षेत्रातील कात्रज प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे.  आपल्या प्रभागात सुरू असलेल्या विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी वसंत मोरे यांनी सीसीटीव्ही बसवले आहे.  या माध्यमातून ठेकेदारांवर वचक ठेवणे शक्य होणार असून यामुळे विकास कामांचा दर्जा राखला जाणार असल्याच मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   

पुणे महापलिकेच्या माध्यमातून नगरसेवक निधीतून विविध प्रभागात विकास कामे करण्यात येत असतात. मात्र, हा विकास करताना ठेकेदारांकडून कामामध्ये कुचराई बाळगण्यात येते. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. यावर उपाय म्हणून मोरे यांनी विकास कामाच्या ठिकाणी सीसीटीवी बसवण्याची संकल्पना समोर आणली आहे.