व्ही. जी. सिद्धार्थ – भारतीय कॉफी किंगचा मनाला चटका लावणारा अंत

विरेश आंधळकर – कोणत्याही शहरात फिरताना हमखास नजरेस पडणारे रेस्टॉरंट म्हणजे CCD – कॅफे कॉफी डे. A Lot Can Happen Over Coffe या ब्रीद वाक्याप्रमाने मागील तीन दशकांपासून याच सीसीडीमध्ये अनेकांची मने जुळली, छोट्या-मोठ्या बिझनेस मिटिंग झाल्या. भारतीयांना खऱ्या अर्थांने कॉफीची चटक लावण्याचे काम सीसीडीने केले. भारतीय कॉफीला जगभरात पोहचवण्यात सीसीडी आणि त्याचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांचा मोलाचा वाटा आहे. हजारो कोटींचे साम्राज्य असणारे सिद्धार्थ मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याचे वृत्त येत होते. आज त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे.

Loading...

गेल्या ३६ तासांपासून व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यांचं झालं काय हा प्रश्न कायम होता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.

केवळ पाच लाखांच्या भांडवलापासून सुरुवात करणारे व्ही जी सिद्धार्थ यांनी आज कॅफे कॉफी डेचे हजारो आऊटलेट देश – विदेशात सुरू केले आहेत. हजारो कोटींचे साम्राज्य उभारूनही आत्महत्या करण्यापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात ‘उद्योजक म्हणून मी अपयशी ठरलो’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सिद्धार्थ यांच्या कुटुंबाचा 140 वर्षांपासून कॉफी बागांचा व्यवसाय आहे. पिढीजात व्यवसायाला आधुनिक करत त्यांनी रोस्टेड कॉफी विकण्यापासून उद्योगाला सुरुवात केली होती, पूढे कॉफी डेच्या रूपाने सिद्धार्थ यांनी रेस्टॉरंटची साखळी तयार केली. भारतीयांची मानसिकता ओळखत कमी पैशात चांगली कॉफी सर्व्ह करण्यावर CCD चा भर राहिलेला होता.

सुरुवातीच्या काळामध्ये फायद्यात असणारा कॉफी डेचा बिझनेस पुढे तोट्यात येण्याचे एक कारण म्हणजे भरमसाटपणे देशभरात उघडण्यात आलेले आऊटलेट. कोणताही व्यक्ती घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला सीसीडी दिसायला हवी या उद्देशाने सिद्धार्थ यांनी गल्लोगल्ली आपले रेस्टॉरंट सुरू केले. यामुळे ग्राहक संख्या वाढण्याची त्यांना आशा होती, मात्र ग्राहक वाढण्याऐवजी ते विभागले गेले. त्यामुळे फायद्यात चालणारे सीसीडी मनुष्यबळ तसेच इतर खर्चामुळे तोट्यात आले. यामध्येच सिद्धार्थ हे इतर व्यवसायांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे आणखीन अडचणीत सापडले होते.

३७ वर्षे कठोर परिश्रमकरून सीसीडी आणि इतर कंपन्यांनी ३०,००० नोकऱ्या निर्माण केल्या, माझा भागभांडवली हिस्सा असलेल्या तंत्रज्ञान कंपनीद्वारे आणखी २०,००० रोजगार निर्माण केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही नफाक्षम व्यवसायाची उभारणी करण्यास आपण अपयशीच ठरलो, असं सिद्धार्थ यांनी शेवटच्या पत्रात लिहिले आहे.

भारतामध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास सिद्धार्थ यांनाही सहन करावा लागला होता. पूर्वीच्या प्राप्तिकर महासंचालकांनी दोन प्रकरणांमध्ये माझ्या समभागांवर जप्ती आणून, माइंडट्रीच्या व्यवहारात अडचणी आणि कॉफी डेच्या समभागांमध्ये नव्याने व्यवहारासाठी प्रतिबंध केला, असे त्यांनी स्पष्टपणे पत्रात म्हटले आहे. सुधारीत विवरण पत्र दाखल केले गेल्यानंतरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्याचा आरोप सिद्धार्थ यांनी केला आहे.

हजारो कोटींचे साम्राज्य, देशातील सर्वात मोठा कॉफी किंग बनलेले व्ही जी सिद्धार्थ यांनी व्यवसायातील अपयशाला कंटाळून केलेली आत्महत्या ही सर्वांनाच चटका देणारी आणि तेवढीच व्यवसायात गुंतवणूक अथवा विस्तार करताना काय काळजी घ्यावी, याची शिकवण देणारी आहे.

महत्वाच्या बातम्या 

#पक्षांतर : गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली; जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका

भाजपची आज मेगा भरती, ५ आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांचा झाला पक्षप्रवेश

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले